प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
स्थानिक स्व.हुकुमचंद कोटेचा सहकार विद्या मंदिर दे.मही शाळेची 100% निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम राहिली आहे ..या वर्षी सुद्धा शाळेचा 100% निकाल लागला आहे. यामध्ये एकूण 102 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 90% च्या वर 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर 80% च्या वर 52 विद्यार्थी तर 75% च्या वर 7 असे घवघवीत यश विध्यार्थ्यांनी संपादन केले..
शुभांगी आनंद सरोदे हिने 97.60% गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला तर कोमल संतोष अंभोरे हिने 97.20% गुण घेऊन दुसरा क्रमांक मिळवला तर रुतीका गजानन बेल्ट हिने 97%गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला.
या उत्कृष्ट निकालाबाबत शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री राध्येश्यामजी चांडक (भाईजी) ,श्री सुकेशजी झंवर सर (अध्यक्ष,बुलडाणा अर्बन को.ऑफ क्रेडिट सोसायटी) ,तसेच कोमल मॅडम ( अध्यक्ष बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी )यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले...
सदर विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर ,पर्यवेक्षक खेडेकर सर,रोहित पराड सर , पडघान सर,केशव तळेकर सर ,पालवे सर ,राहुल सर,दुगड मॅडम,यांसह सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.....





Social Plugin