*सुबोध तुरेराव यांना महाराष्ट्र एक्सलन्स पुरस्कार प्रदान*
*नांदेड* येथील * सुबोध तुरेराव* यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड 2026 मिळाला असून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने महाराष्ट्र दिना निमित्य आयोजित महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 कार्यक्रम मलकापूर येथील डॉ. हेडगेवार सभागृह येथे आयोजित करण्यात आला. सदर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कानाकोपऱ्यातील आलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सत्कार करण्यात आला .
आंतरराष्ट्रीय मानांकन आयएसओ 9001_2015 प्रमाणित प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 चे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रस्ताव ऑनलाइन मागवण्यात आले होते.
त्यावेळी 543 प्रस्तावांपैकी निवड करून 165 मान्यवरांना महाराष्ट्र एक्सलन्स पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. तसेच शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य कार्य करणाऱ्या 110 शिक्षकांचा सुद्धा महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन बी शिंदे साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी) , कार्यक्रमाचे उद्घाटक वैभव आढाव प्राचार्य फार्मसी कॉलेज, तर प्रमुख पाहुणे धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ, काळपांडे मॅडम प्राचार्य चांडक विद्यालय , हे होते कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड 2026 देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र गंणगे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.





Social Plugin