🌸 देवगड तालुका प्रतिनिधी अमोल शिर्के🌸 महाराष्ट्र ग्रामीण न्युज 🌸
सध्या कोकणामध्ये विविध ठिकाणी गावागावांमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे व त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत. सध्या कोकणामध्ये मुंबईतील चाकरमाने पर्यटक कोकणातील गावागावात फिरायला येतात त्यानिमित्ताने त्या निमित्ताने त्यांना गावागावात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले व त्यानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे गावागावात दिसण्यात आले. तसेच आंबा हा सीजन चालू असल्यामुळे पर्यटक आंब्या खाण्याच्या उत्सुकतेच व खरेदी करण्याच्या दिसण्यात आलेला आहे. अनेक मुंबईतील चाकरमानी व पर्यटन शाळेच्या सुट्टीत गावागावात फिरायला आलेले आहे. प्रत्येक गावागावात व वाडी वाडी मध्ये श्री सत्यनारायणाची महापूजा व लग्नसराई, व त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम दिसण्यात आलेले आहेत. अनेक मान्यवरांनी कोकणामध्ये आपली उपस्थिती दर्शवलेली आहे. ठिकठिकाणी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करतात त्याचबरोबर भजन सम्राट यांनी सुद्धा आवर्जून हजेरी गावागावात लावलेली आहे. यंदा कोकणामध्ये उष्णता जरी जास्त असली तरी पर्यटकांनी आपली उपस्थिती ही कोकणात जास्त दर्शवलेली आहे. तसेच देवगड तालुक्यातील केळये वाडी येथील वाडी मध्ये दिनांक 12 -5 -2026 या दिवशी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तेथे कार्यक्रम महिलांसाठी हळदी कुंकू,भजन, कीर्तन, डान्स स्पर्धा संगीत खुर्ची, वेशभूषा स्पर्धा, व श्री सत्यनारायण महापूजेचा महाप्रसाद, श्री संदीप डांबरे बुवा यांचे भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम श्री सत्यनारायण महापूजेच्या निमित्ताने या वाडी मध्ये ठेवण्यात आलेले आहे. तरी त्यातील स्थानिक ग्रामस्थानाने व गावातील मंडळींनी या महापूजेचा व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती. असे हे कोकणातले मे महिन्यातले कार्यक्रम कोकणातील ग्रामस्थानाने आपल्या संस्कृती प्रमाणे आखलेले आहे तेव्हा ही संस्कृती अशीच राहावी व त्यांना भरभराटी मिळावी ही ईश्वरचरणी प्रार्थना🌸 महाराष्ट्र ग्रामीण न्युज 🌸





Social Plugin