बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शेकडा100% लागला आहे.प्रथम कुमारी आर्या विठ्ठल पोतेकर 89.40%, द्वितीय क्रमांक राधिका बापुराव मसुगडे87.80, तृतीय क्रमांक त्रिशा समाधान फडतरे 85.60% गुण प यांनी प्राप्त केले .
सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था दरवर्षी आपल्या शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 'संस्था आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करते, विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देते व पुढील यशासाठी प्रेरणा देते. श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी ही दुर्गम आणि डोंगरी भागातील शाळा .शिक्षणाचे साधन म्हणजे फक्त शाळांमध्ये केलेले मार्गदर्शन इतर कोणतेही क्लास नाही किंवा इतर कोणतेही बाह्य मार्गदर्शन नाही. मात्र या गावातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक मात्र प्रचंड आहे . त्यामुळे संस्थेने या काही वर्षात सर्व शाखांसाठी 'टॉप टेन विद्यार्थी 'हा प्रकल्प राबवला आणि अशा गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन ,योग्य आदर्श मिळावे यासाठी काही उपक्रम राबवले . शिक्षकांचे मार्गदर्शन, गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे विविध प्रयत्न आणि संस्थेने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी राबवलेले वेगवेगळे प्रयोग .याचाच परिणाम म्हणजे संस्थेच्या विविध शाखांना लाभलेले इयत्ता दहावीचे घवघवीत यश .यामध्येच रणसिंगवाडी हायस्कूलचा देखील समावेश होतो .यामुळेच दरवर्षी या गावातून गुणवंत विद्यार्थी बाहेर पडतात,' संस्था आपल्या दारी' या संस्थेच्या उपक्रमाअंतर्गत संस्था सचिव श्री मोहनराव जाधव (नाना ), अध्यक्ष श्री सुरेशराव जाधव, विश्वस्त श्री सुरेश पाटील आणि गुणवत्ता वाढ प्रकल्पाचे जनक श्री के.डी पवार सर, तसेच श्री हनुमान गिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री गोफणे सर, रणसिंगवाडीचे पोलीस पाटील श्री सुनील रणसिंग, शालेय प्रगतीसाठी धडपडणारे ग्रामस्थ श्री अशोक निंबाळकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान फडतरे, सर्व ग्रामस्थ,पालक व मुख्याध्यापिका सौ.पाटील मॅडम ,उपशिक्षक श्री गिरी गोसावी सर, सौ जाधव मॅडम, गायकवाड मॅडम, सौ मदने मॅडम ,डॉ. राधाकृष्णन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका धनश्री पोतदार मॅडम , सौ मनेर मॅडम ,सौ कोरडे मॅडम,अभंग मामा, श्री गायकवाड सर ,श्री चव्हाण सर या सर्वांतर्फे इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी कुमारी आर्या पोतेकर, राधिका मसुगडे ,
त्रिशा फडतरे या विद्यार्थिनींच्या प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.





Social Plugin