Ticker

6/recent/ticker-posts

मेहकर पोलिसांची मोठी धडक कारवाई पोलीस अंमलदारावर हल्ला करणाऱ्या अट्टल चोरट्यांच्या २४ तासांत आवळल्या मुसक्या



३ आरोपींना अटक!

मन्सूर शहा धोत्रा.भ.चिखली.:---

प्राप्त माहितीनुसार,मेहकर शहरातील लक्ष्मीनारायण नगर भागात जबरी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या व त्यांना प्रतिकार करणाऱ्या पोलीस अंमलदारावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांचा मेहकर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ३ अट्टल आरोपींना जेरबंद केले असून त्यांचे इतर साथीदार आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे शहरातील मोठी घरफोडी टळली आहे.

दिनांक २२ मे २०२६ रोजी पहाटे ३:०० ते ३:३० वाजताच्या सुमारास मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लक्ष्मीनारायण नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये काही चोरटे शिरल्याची माहिती रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलीस अंमलदारांना स्थानिक नागरिकांकडून मिळाली. माहिती मिळताच गस्तीवरील अधिकारी व चालकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी पोलिसांवरच हल्ला चढवला आणि त्यांना जखमी केले. या झटापटीत चोरट्यांनी घटनास्थळावरून सुमारे ६,००० रुपये किमतीचे तीन तोळे चांदीचे दागिने आणि ६०,००० रुपये किमतीची एक ड्रीम युगा मोटारसायकल (एमएच २८...) असा मुद्देमाल चोरून नेला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि ३ पथके रवाना

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट दिली. तपासाबाबत योग्य मार्गदर्शन करून गुन्हा उघडकीस आणण्याच्या आणि आरोपींचा शोध घेण्याच्या कडक सूचना दिल्या.