Ticker

6/recent/ticker-posts

*राळेगावमध्ये भीषण आग; तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली!*



ग्रामीण प्रतिनिधी गुजरी स्वप्नील घोटेकार 

आज 29 मे ला राळेगाव येथील रावेरी पॉईंट परिसरात अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर (सुमारे ४४°C तापमान) ही आग वेगाने पसरत होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेची माहिती राळेगाव येथील *प्रकाश खुळसंगे व गौरव जिद्देवार* यांनी तात्काळ डॉ. कुणाल भोयर यांना फोनद्वारे दिली. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉ. कुणाल भोयर यांनी कोणताही वेळ न दवडता नगरपंचायत चे कर्मचारी जिवनभाऊ जळीतकर यांच्याशी संपर्क साधला आणि *अवघ्या ३ मिनिटांट अग्निशमन दलाची गाडी त्वरित घटनास्थळी पाठवण्याची व्यवस्था केली*.

अग्निशमन दल वेळेत पोहोचल्यामुळे आणि तातडीने कारवाई केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. अन्यथा या भीषण उष्णतेत संपूर्ण राळेगाव परिसराला आगीने वेढा घालण्याची शक्यता होती.

या प्रसंगी तहसीलदार अमितजी भोईटे, A.P.I.दंडे साहेब शशिकांत धुमाळ, शुभम मुके, स्वप्नील घोटेकार, नरेश राऊत, स्वप्निल माकोडे तसेच राळेगाव येथील अनेक नागरिकांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले.

ग्रामीण प्रतिनिधी गुजरी स्वप्नील घोटेकार