Ticker

6/recent/ticker-posts

*कारंजा मूर्तिजापूर रोडवर डिझेल टँकर पलटी, खाली अडकलेल्या चालकाला ग्रामीण पोलिसांनी दिले जीवनदान



 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

* प्राप्त माहितीनुसार डिझेल टँकर क्रमांक MH 48 AU 8851 मुंबईवरून वर्धासाठी जात असताना सकाळी साडेपाच कारंजा ते मूर्तीच्यापुर रोडवर तक्षशिला महाविद्यालयाजवळ सकाळी एक भीषण अपघात घडला. डिझेलने भरलेला टँकर अचानक नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की टँकरच्या केबिनखाली चालक गंभीररित्या अडकला होता आणि टँकरमधून डिझेलची गळती सुरू झाली होती. घटनास्थळी मोठी आग लागण्याची भीती निर्माण झाली होती.*ग्रामीण पोलिसांची तत्परता

घटनेची माहिती मिळताच कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पीएसआय मुकुंद जाधव फिरोज खान प्रतीक राऊत पल्लवी मोठे यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी दाखल झाले . . डिझेल गळतीमुळे आग लागू नये म्हणून अग्निशामक दलाला माहिती दिली .

 आणि तात्काळ नाखले क्रेन यांना घटनास्थळी बोलावले *जीव धोक्यात घालून बचावकार्य  

टँकरखाली अडकलेल्या चालकाचे नाव शैलेश चौधरी वय 26 रा मनमाड नाशिक असे आहे. त्याचा संपूर्ण शरीर केबिन खाली दबल्यामुळेचालक वेदनेने तळमळत होता . पोलीस उपनिरीक्षक मुकुंद जाधव आणि पोलीस हवालदार फिरोज प्रतीक राऊत पल्लवी मोठे यांनी क्रेनच्या सहाय्याने अत्यंत सावधगिरीने टँकरचा भाग उचलला. जवळपास 45 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर जखमी चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

 अपघाताची माहिती उदय क्रेनचे संचालक पुनीत बोरसे यांनी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी चालकाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की वेळेत मदत मिळाल्याने चालकाचे प्राण वाचले. त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली असून पुढील उपचार सुरू आहें

*पोलीस दलाचे कौतुक 

"पोलीस वेळेवर आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता. डिझेल टँकरचा स्फोट झाला असता तर अनेकांचे जीव गेले असते, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी नागरिक त्यावेळी दिली.

सेवा, सुरक्षा आणि मदत या ब्रीदवाक्याला जागणाऱ्या कारंजा ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीमुळे कौतुक होत आहे.