बुध दि. [प्रकाश राजेघाटगे ]
वाई तालुक्यातील दसवडी येथे प. पू. श्री. सेवागिरी महाराज मंदिराचा आठवा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा झाला. या सोहळ्यात ह.भ.प. आदित्य महाराज यादव यांचा सुश्राव्य हरिपाठ झाला. काकड आरती व मंगल आरती, श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमेची व पादुकांची रथातून भव्य ग्रामप्रदक्षिणा काढण्यात आली. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. प्रथमच पुसेगाव येथील शशिकांत ब्रास बॅन्डचे पथक सामील झाले होते . शोभायात्रेत ज्ञानाई गुरुकुल अकलुजचे विदयार्थी बहुसंख्येने उपस्थित होते . त्यामुळे भक्तीमय वातावरण झाले होते . ओम नमो नारायण, ओम नमो श्री सेवागिरी महाराज या जयघोषाने संपूर्ण दसवडी दुमदुमून गेली होती.
श्री. सुंदरगिरी महाराजांच्या हस्ते महाभिषेक, महापूजा, आरती व पुष्पवृष्टी करण्यात आली. वाई तालुका पंचक्रोशीतील वाई गंगापपुरीचे कृष्णाई महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व कुंकवाचा कार्यक्रम झाला. शिवचरित्रकार वाणीभूषण ह.भ.प. गुरु देव महाराज चव्हाण (कोपरगावकर) यांचे कीर्तन झाले. ना. मकरंद पाटील यांनी दर्शन घेतले. ना. पाटील यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
कार्यक्रमास न्यू सातारा समूहाचे अध्यक्ष नानासाहेब निकम, ज्ञानदीप पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व्ही. जे. पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राजेंद्र शेलार, पांडुरंग भिलारे, अॅड. पाटणे, उद्योजक राहुल गोंजारी, वाईचे नगरसेवक सुशील खरात, उत्तम बडे, उद्योजक पांडुरंग निकम, उद्योजक बाबासाहेब जाधव, उद्योजक नीलकंठ भोसले, टाटा पॉवरचे सुभाषचंद्र पांडे, ह.भ.प. विकास भीलारे व पुसेगाव गावातील सुसेन जाधव, विठ्ठल तोडकर, प्रदीप शेठ देशमुख, राजू गाडे अशा गावकऱ्यांनी तसेच अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प. पू. श्री सेवागिरी महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेतले.
श्री महाराज सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगावचे मठाधिपती १०८ महंत श्री सुंदरगिरीजी महाराज आणि सोळशी येथील श्री शनिदेव देवस्थानचे शिवयोगी प. पू. नंदगिरीजी महाराज यांनी कार्यक्रमास उपस्थित सर्व भक्तांना आशीर्वाद दिले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या मंगलमय सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभघेऊन या दोन दिवसात खऱ्या अर्थाने एक आनंदाचे पर्व सुरू होते, त्या आनंदाच्या व अनुभूतीच्या शिदोरीसह प्रत्येकजण आपआपल्या गावी परतले असल्याचे आनंद शेठ फणसे यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर कमिटी, दसवडी आणि समस्त आनंद शेठ फणसे व सौ. लीला शेठ व फणसे परिवाराने परिश्रम घेतले.





Social Plugin