Ticker

6/recent/ticker-posts

गिंभा गावातील सुपुत्राची PSI पदी निवड कष्टाला मिळाले यशाचे फळ.

 



डॉ गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी                                

   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) नुकत्याच जाहीर झालेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत गिंभा येथील सुरज विष्णू आडे याने घवघवीत यश मिळवत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड होऊन गावचे नाव उंचावले आहे. सुरज विष्णू आडे 

 याच्या यशाबद्दल सांगायचे तर, अतिशय सामान्य परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण मोहरी येथे झाले असून, महाविद्यालयीन शिक्षण किनवट येथे झाले. 2012 मध्ये पोलीस या पदावर त्यांची निवड झाली त्यानंतर पोलीस या पदावर असून सुद्धा आपली ड्युटी बजावत MPSC परीक्षेची कठोर तयारी केली होती. विष्णू रामजी आडे वडील व आई कुसुमबाई विष्णू आडे हे शेतकरी/मजूर असून त्यांनी मुलाच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही. पत्नी अश्विनी सुरज आडे त्यांनी सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांना सुरज विष्णू आडे याने आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या व कष्टाला आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला दिले आहे. "कठोर परिश्रम आणि सातत्य असल्यास यश निश्चित मिळते," असे तो सांगतो. त्याची PSI पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन केले जात आहे.