महाराष्ट्र ग्रामीण न्युज अहिल्यानगर
(प्रतिनिधी – शरद धाडगे)
नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, धाडगे वस्ती येथे १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत सदस्य संजय भाऊ आढागळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच शालेय विद्यार्थ्यांना निकालाचे वाटप करण्यात आले. इयत्ता पहिलीत नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अकोलकर मॅडम, बावलगे मॅडम व उपस्थित पालकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी भागचंद पाटील चावरे, राजाराम धाडगे, जालिंदर धाडगे, बाबासाहेब धाडगे, मच्छिंद्र धाडगे, शरद धाडगे, नंदकुमार धाडगे, सुधाकर धाडगे, बबन धाडगे, मच्छिंद्र जाधव, बापू तात्या धाडगे यांच्यासह अनेक पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.





Social Plugin