Ticker

6/recent/ticker-posts

NEET अवघड, नको रे बाबा' - विद्यार्थ्यांचा कल Engineering कडे



अर्धापुर प्रतिनिधी | एस. सावंत

 'NEET खूप अवघड झाली, नको रे बाबा' अशी विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता बनल्याने जिल्ह्यात Engineering प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल झपाट्याने वाढला आहे. गेल्या 3 वर्षात NEET च्या कठीण प्रश्नपत्रिका, वाढलेली कटऑफ आणि तीव्र स्पर्धेमुळे हजारो विद्यार्थी ड्रॉप घेऊनही सरकारी MBBS कॉलेजपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आता 12वी Science च्या विद्यार्थ्यांनी पर्यायी करिअर म्हणून Engineering ला पसंती दिली आहे.

शैक्षणिक तज्ज्ञांच्या माहितीनुसार, यंदा MHT-CET आणि JEE साठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 35% वाढ झाली आहे. याउलट NEET साठी नव्याने नोंदणी करणाऱ्यांची संख्या स्थिर आहे. विद्यार्थी म्हणतात, "2-3 वर्ष NEET ला वाया घालवण्यापेक्षा 4 वर्षात Engineering पूर्ण करून चांगल्या पॅकेजची नोकरी मिळवणे परवडते. CS, IT, AI सारख्या ब्रांचला तर 8-15 लाखापर्यंत पॅकेज मिळत आहे."