Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामपंचायत कर्मचारी राज्यस्तरीय महाअधिवेशन छत्रपती संभाजीनगर, येथे 20 जूनला!!



 मन्सूर शहा.धोत्रा.भ.चिखली.:---

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे भव्य राज्यस्तरीय महाअधिवेशन शनिवार २० जून रोजी दुपारी २ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील आदिती लॉन्स, लाडगाव येथे होणार आहे. युनियनचे संस्थापक अध्यक्ष गिरीश दाभाडकर यांच्या संकल्पनेतून या अधिवेशनाचे करण्यात आले आहे. 

अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे तसेच आमदार व महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियनचे राज्य अध्यक्ष बच्चूभाऊ कडू उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढ, सेवा शर्ती, पेन्शन योजना, प्रलंबित मागण्या आणि इतर विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. या महाअधिवेशनाला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विवेकानंद पवळ यांनी केले आहे.