बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध ता .खटाव येथे दहावी सन 1991-92 बॅचचा 34 वर्षानंतर स्नेह मेळावा विद्यालयात आयोजित करण्यात आला होता . स्नेह मेळाव्याच्या आदल्या दिवशीपासून माजी विद्यार्थी एकत्र येऊन प्राचार्य व शिक्षक यांच्याशी स्नेह मेळाव्याचे नियोजनात व्यस्त होते . विद्यालयातील विद्यार्थिनीनी विद्यालयाच्या मुख्य गेट पासून रांगोळी काढून मोठ्या उत्साहामध्ये त्यांचे स्वागत केले .विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह मेळावा संपन्न झाला . विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आजी-माजी शिक्षक यांना बॅज लावून त्यांचे औक्षण केले . फुलांच्या वर्षाव करून व हलगी वादयवृंद वाजवून व फटाके फोडून सर्व गुरुजनांचे मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केले . यावेळी उपस्थित शिक्षक यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमाना अभिवादन करून व दीप प्रज्वलने कार्यक्रमाची सुरुवात झाली .हयात नसलेले शिक्षक व विद्यार्थी यांना सर्वप्रथम भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली . यानंतर विद्यालयातील विद्यार्थिनी संस्था प्रार्थना व स्वागत गिताने कार्यक्रमाची सुरुवात केली .विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये विद्यालयाचा सर्वांगीण विकासासाठी करत असलेले प्रयत्न याबाबत माहिती दिली तसेच विद्यालयातील वर्गखोल्याना रंगरंगोटी व मैदान करून मिळावे आशी अपेक्षा व्यक्त केली . यानंतर माझी विद्यार्थी यांनी आपली ओळख करून दिली व मनोगत व्यक्त केले तसेच आपल्या बद्दल माहिती करून दिली . काही माजी विद्यार्थी यानी शालेय जिवनातील आठवणी सांगितल्या . या बॅच च्या वतीने आजी-माजी गुरुजनांचा स्मृतिचिन्ह व शाल श्रीफळ देऊन सन्मान केला . तसेच विद्यालयाची आठवण म्हणून गुरुजनांच्या हस्ते माजी विद्यार्थी यांना देखील स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला .
यावेळी उपस्थित शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमासाठी माजी शिक्षक जगताप संपतराव ,पोळ विलासराव , मांडके बी .पी ., साळुंखे एम डी , गायकवाड शहाजी , देशमूख डी के शिंदे एल ए , संपत जगदाळे , कांबळे टी.डी . यादव एस.एम व विद्यालयातील शिक्षक प्राचार्य अंकुश भांगरे ,नाना दडस ,, विशाल नाळे , शिंदे श्रीनिवास , संजय माने , नवनाथ काळे , चंदा वाईकर ,नामदेव धनवडे, महादेव खोमणे , विकास कांबळे यांचाही सम्मान करण्यात आला . स्नेह मेळावा यशस्वी होण्यासाठी संदिप गोसावी , विलीन घाडगे , सुहास घाडगे , सतिश गोसावी , संदिप जगताप , प्रविण खापे ,दिपक घनवट , श्रीनिवास जगदाळे यानी प्रयत्न केले . या बॅच मधील माजी विद्यार्थी संदिप जगताप 31000 , छाया चव्हाण 11000, सतिश गोसावी 25000, हेमंत घाडगे 25000 , शंकरराव खापे 51000 रु देणगी जाहीर केली . त्याबद्दलविद्यालयाच्या वतीने सर्वांचे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केले . तसेच मैदान तयार करण्यासाठी ही प्रयत्न करणार असे सांगितले .
.सर्वांसाठी स्वादिष्ट जेवण व चहा ,नाष्ट्याची उत्तम सोय करण्यात आली होती . या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक घनवट व आशाराणी बोराटे मॅडम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार सतिश गोसावी यानी मानले .





Social Plugin