Ticker

6/recent/ticker-posts

येणेगुर येथे ग्रामपंचायतीच्या नावाखाली बेन्नीतुरा नदी पात्रातून अवैध वाळू-खडी उपसा जोरात महसूल विभागाचे दुर्लक्ष



उमरगा प्रतिनिधी 

येणेगुर:येथे स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाच्या अंतर्गत गावातील रस्ते विकास कामाच्या नावाखाली जवळपास आठ ते दहा दिवसापासून जास्तीच्या प्रमाणात गौण खनिज उपसा सुरू आहे. या शासकीय कामाचे नाव पुढे करून बेन्नीतुरा नदी पात्रातून कोणती रीतसर परवानगी घेतली आहे का न घेता दिवस-रात्र अवैध वाळू आणि खडीचा उपसा केला जात आहे. जर घेत नसेल तर याप्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून नदी पात्राचे मोठे नुकसान होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कामासाठी ठरावीक मर्यादेत गौण खनिज उत्खनन ची मुभा असल्याचा गैरफायदा काही कंत्राटदार आणि स्थानिक व्यावसायिक घेत आहेत. बेन्नीतुरा नदी पात्रातून जे सी बी ने उत्खनन करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेसुमार वाळू उपसा करून ती इतरत्र आव्वाचे सव्वा चढ्या भावाने विक्री करत आहेत याची ग्रामस्थांमध्ये चर्चा रंगत आहे तसेच परिसरातून मोठ्या प्रमाणावर खडी चेही अवैध उत्खनन सुरू आहे. शासकीय कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या या खासगी गोळा बेरजेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे हा सर्व प्रकार उघडपणे सुरू असतानाही स्थानिक महसूल प्रशासन आणि संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, आता यापुढे तरी प्रशासनाचं वचक राहिल का अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.