Ticker

6/recent/ticker-posts

खातगुण येथील अटाळी शिवार रस्त्यासाठी जाधव परिवाराकडून स्वखर्चातून सिमेंट पाईप; शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न सुटला, ग्रामस्थांकडून गौरवभैय्या व स्नेहलताईंचे आभार




बुध  दि [प्रकाश राजेघाटगे ] 

खातगुण ता . खटाव येथील अटाळी शिवारात जाणारा जुना भोसरे रस्ता महाराष्ट्र शासनाच्या 'महा राजस्व अभियान' अंतर्गत मंजूर होऊन तयार होत आला आहे. मात्र, या रस्त्यावर एक आडवी ओघळ (पाण्याचा प्रवाह) असल्याने पावसाळ्यात तेथून शेतकऱ्यांना दळणवळण करणे अत्यंत अडचणीचे ठरणार होते. या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठ्या पाईप टाकणे अत्यंत आवश्यक होते, परंतु शासनाच्या या योजनेअंतर्गत या बाबीसाठी आर्थिक तरतूद नव्हती. त्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली होती.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कांदा-बटाट्याचे व्यापारी व सोसायटीचे माजी चेअरमन विजय लावंड आणि वसंतराव जाधव गुरुजी यांच्या विशेष प्रयत्नाने, सहकार्याने, सर्व शेतकरी पुसेगाव गणाच्या विद्यमान पंचायत समिती सदस्या आदरणीय सौ. स्नेहलताई गौरव जाधव यांच्याकडे गेले. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता, दानशूर युवानेते श्री. गौरवभैय्या जाधव यांनी तत्परता दाखवत अवघ्या एका दिवसात स्वखर्चातून संबंधित ठिकाणी दहा फुटी दोन मोठ्या सिमेंटच्या पाईप पोहोच केल्या. गौरवभैय्यांनी दाखवलेल्या या विशेष तत्परतेमुळे अटाळी शिवारातील रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न सुटला आहे.

सौ. स्नेहलताई गौरव जाधव यांना पुसेगाव गणातून निवडून आणण्यासाठी खातगुण गावातून वसंत गुरुजी, विजय लावंड, प्रमोद भोसले, निखिल माने, उपसरपंच बाळासाहेब लावंड आदींनी मोलाचा वाटा उचलला होता. त्याचीच कृतज्ञता म्हणून आणि लोकसेवेचा वसा जपत गौरवभैय्यांनी खातगुणसाठी तातडीने पाईप उपलब्ध करून दिल्याने संपूर्ण परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

या मोलाच्या मदतीबद्दल खातगुणमधील शेतकरी दयानंद शिर्के, वसंत मारुती जाधव, पांडुरंग जाधव, अमित लावंड, सुनील सस्ते, त्रिंबक सस्ते, अमर गायकवाड, नितीन पवार, सलीम शेख, युवराज गायकवाड, अशोक लावंड, सचिन लावंड, अभिषेक लावंड (बाबू) व सर्व ग्रामस्थांनी सौ. स्नेहलताई जाधव व श्री. गौरवभैय्या जाधव या उभयतांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले. "जाधव उभयतांना निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच निरंतर समाजसेवा घडत राहो," अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

श्री. वसंतराव जाधव गुरुजी (मुख्य प्रवर्तक - राम रहीम संघटना तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, खातगुण), संजय राजाराम गुजर (अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस), सरपंच श्रीमती अमिना सय्यद, उपसरपंच श्री. आनंदराव गोरख लावंड, सर्व आजी-माजी सदस्य ग्रामपंचायत खातगुण, चेअरमन श्री. अंकुश चंद्रभान जाधव, व्हाईस चेअरमन सौ. मंगल सदाशिव लावंड, सर्व आजी-माजी संचालक वि.का.स. सेवा सोसायटी खातगुण, समस्त ग्रामस्थ, राम रहीम संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांनी अभिनंदन करून आभार मानले