सोनपेठ प्रतिनिधी ( शिवशंकर तुपकर )
सोनपेठ तालुक्यातील थडी उक्कडगावचे दत्त मंदिर आणि निमगावच्या मारुती मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण
सोनपेठ: तालुक्यातील धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. मौजे थडी उक्कडगाव येथील जागृत श्री दत्त मंदिर आणि निमगाव येथील नवसाला पावणारा मारुती मंदिर या दोन्ही श्रद्धास्थानांना जिल्हा नियोजन विभागाकडून ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा मंजूर करण्यात आला आहे. हा निर्णय संपूर्ण सोनपेठ तालुका आणि परिसरासाठी ऐतिहासिक मानला जात आहे.
.jpg)




Social Plugin