सोनपेठ प्रतिनिधी ( शिवशंकर तुपकर )
सोनपेठ दहिखेड येथील रमण गौतम कांबळे या १६ वर्षांच्या मुलाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आई-वडील रोजमजुरी करणारे असून, घराचा तरुण आधार हिरावला गेल्याने हे गरीब कुटुंब संपूर्णपणे खचले आहे.
आज या पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत सामाजिक कार्यकर्ते राजू मुस्तफा सौदागर, शेख युसुफ रशीद आणि वाजिद अहमद कुरेशी यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. तसेच या गरीब कुटुंबाला तात्काळ रोख आर्थिक मदत सुपूर्द केली.शासकीय मदत मिळेपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे राजू मुस्तफा सौदागर यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे, पण एक समाज म्हणून आपणही अशा कठीण काळात या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.आपल्या छोट्याशा मदतीने या दुःखी कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो.





Social Plugin