प्रतिनिधी :- राजेश दामोदर
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे अन्न व औषध प्रशासन तसेच संबंधित विभागाच्या पथकाने मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले.
सध्या संबंधित ठिकाणी पंचनामा व जप्तीची प्रक्रिया सुरू असून, जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत व नेमके प्रमाण याबाबतची अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. अधिकृत माहिती उपलब्ध झाल्यानंतर जप्त मालाचे मूल्य, आरोपींची नावे व पुढील कायदेशीर कारवाईबाबत स्पष्टता येणार आहे.





Social Plugin