बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील प्रज्ञा सुरक्षा शीतलकुमार जाधव हिने सीए परीक्षेत यश मिळविले. प्रज्ञाचे माध्यमिक शिक्षण सातारा येथील निर्मला कॉन्व्हेन्ट हायस्कूलमध्ये, तर धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजमध्ये अकरावी, बारावीचे शिक्षण वाणिज्य शाखेतून झाले. आर्ट अँड कॉमर्स कॉलेज सातारा येथून तिने वाणिज्य शाखेची पदवी घेतली. त्यानंतर सातारा येथील सीए आनंद कासार, सीए जीवन जगताप, सीए मयुरेश बागल यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यास केला. बाविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तिने यश संपादन केले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन जगनशेठ जाधव यांची ती पुतणी आहे .





Social Plugin