Ticker

6/recent/ticker-posts

मोहरम अलविदा जव्हार शहरात साजरा


जव्हारमध्ये मोहरम उत्सव भक्तिभावाने व शांततेत संपन्न

प्रतिनिधी : जव्हार | विजय अधिकार

जव्हार शहर व तालुक्यात मोहरम उत्सव धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. जव्हार मध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि "या हुसैन"च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

 छोट्या छोटया मुलांनी संपूर्ण जव्हार शहरात सरबत चे वाटप केले. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असल्याने संपूर्ण कार्यक्रम शांततेत पार पडला.

मोहरमच्या निमित्ताने इमाम हुसेन यांच्या त्याग, शौर्य आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण करण्यात आले. सुन्नी जामा मस्जिद चे पेश वे इमाम नौशाद आलम साहेब यांनी जव्हार शहरात व देशात पावशा साठी विशेष दुआ केली व नागरिकांनी अमीन अमीन अमीन. मिरवणुकीत जेष्ठ नागरिक मान्यवर आणि तरुणाचा मोठा सहभाग. नागरिक साजिद मेमन, दानिश पिरझादे, इमरान चाबुकस्वार, आफताब मणियार