प्रतिनिधी प्रा डॉ विजय गायकवाड
रिसोड : रिसोड मधील प्रसिद्ध निसर्गरम्य परिसर असलेल्या सर्व सोयी सुविधायुक्त डॉ प्रकाश पार्क येथील मा सरजूदेवी उद्यान येथील स्व तरुण बगडिया स्पोर्ट कॉम्प्लेक्स मध्ये महिलांद्वारे महिलाकरिता आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रिसोड परिसर व आसपासच्या भागातील वीस ते पन्नास वयोगटातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. यामध्ये ताडासन, वर्जासन, भुजंगासन, प्राणायाम, कपालभारती, सर्वांगासन, हलासन, सेतुबंधासन, शवासन, धनुरासन, शलभासन, वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन व पद्मासन अशा वेगवेगळी प्रकारची आसने करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक श्री निशांत बगडिया यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले की "प्राणायाम आणि ध्यानामुळे ताणतणाव दूर होऊन मन शांत होते. योग हे शरीर, मन आणि अध्यात्म यांचा संगम घडवून आणतो. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याला जोडणे किंवा एकत्र आणणे. योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून एक जीवन जगण्याची समग्र पद्धत आहे. व यासाठी आमच्या डॉ प्रकाश पार्क येथील निसर्गरम्य परिसरात आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन निःशुल्क करणार आहोत असे ते म्हणाले. योगासने संपल्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आले.





Social Plugin