बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
विदयार्थ्यांनी अभ्यासाबरोबर जीवन शिक्षण घेणे गरजेचे आहे. शिक्षणाचा केवळ नोकरी मिळवणे हा उद्देश न ठेवता यशस्वी व्यक्तीमत्व घडवण्याकरता व्हायला हवा.
तसेच सेवानिवृत्त शिक्षकांचे योगदान आणि त्यांच्या प्रामाणिक कामामुळे कायम विद्यार्थी व संस्थेच्या स्मरणात राहील. भविष्यात देखील त्यांच्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा सर्वांना होईल. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य आनंददायी व आरोग्यदायी ठरावे,असे विचार संस्था अध्यक्ष डॉ. श्री. सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले .ते श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव आयोजीत इयत्ता 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी, शिष्यवृत्तीधारक व अन्य परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सत्कार समारंभ तसेच सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते.संस्था सचिव श्री मोहनराव जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना आयुष्यातअभ्यासाबरोबर खेळाचेही महत्त्व असल्याचे विशद केले.
उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाकरता अत्याधुनिक सुविधा तसेच दर्जेदार शिक्षण देण्याकरता संस्था प्रयत्नशील असून विद्यार्थ्यांचे यश हा साऱ्यांचा अभिमान असल्याचे नमूद केले.विश्वस्त श्री एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले.श्री डी. एन. गोफणे, श्री आर्.एन. जाधव ,श्री व्ही.बी . भोसले ,सौ एम. एस. चव्हाण यांनी शिक्षक मनोगते व्यक्त केली.
यावेळी सेवानिवृत्त श्री. एस. जी. जाधव, सौ बी. आर. पवार ,श्री डी. व्ही. देशमुख, श्री एस. बी. चव्हाण यांचा संस्थेच्या विविध शाखांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.सेवानिवृत्त शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना संस्था पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले .विश्वस्त श्री योगेशराव देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रमास खजिनदार श्री लक्ष्मणराव जाधव,संस्था सदस्य श्री जयंतराव जाधव, श्री विजयसिंह जाधव, विद्यार्थी गुणवत्तावाढ प्रकल्प अधिकारी श्री के. डी.पवार सर,मुख्याध्यापक श्री गोफणे डी. एन., श्री जाधव आर एन., श्री वळवी ए. के., सौ खटावकर एन. बी.,प्रा. जे. बी. जाधव,सौ. पाटील मॅडम, सौ स्नेहल जाधव, कुमारी धनश्री पोतदार, श्री कुचेकर,सौ लाड एस. जे. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin