![]() |
छायाचित्र _वेटणे ग्रामस्थांनी निवृत्त देशसेवक ऑनररी कॅप्टन अजित नलावडे यांची भव्य मिरवणूक काढली. |
बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
३१ वर्षांच्या प्रदीर्घ देशसेवेतून वेटणे, ता. खटाव येथील ऑनररी कॅप्टन अजित गणपत नलावडे निवृत्त झाल्याने ग्रामस्थांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत त्यांच्यासह कुटुंबीयांची भव्य मिरवणूक काढली.
यावेळी आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे, पंचायत समितीच्या उपसभापती रेश्मा शेडगे, देवस्थान ट्रस्टचे माजी चेअरमन व माजी विश्वस्त मोहनराव जाधव, माजी चेअरमन व ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त रणधीर जाधव, भाजप जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, बुधचे सरपंच अभय राजेघाटगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मानाजी घाडगे, मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष महेश नलावडे, शिवाजी शेडगे व नितीन नलावडे, राजू घाटगे-पाटील, आजी माजीसैनिक संघटनेचे अध्यक्ष अमोल नलावडे, कॅप्टन बाबा गुंजवटे, सर्व आजी-माजी सैनिक, राहुल फडतरे, शशिकांत रोमन, गणेश बोटे यावेळी उपस्थित होते.
गावोगावची तरुणपिढी देशसेवेसाठी घडविण्यात माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा, माजी सैनिकांच्या अनुभवाचा फायदा या भागातील तरुणांना व्हावा. लागेल ती मदत करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगून खटाव तालुक्यातील हा शेवटचा दुष्काळ असेल, अशी पाणी योजना संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावात अमलात येत असल्याचे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
चौकट-मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी अजित नलावडे यांचे औक्षण केले. यावेळी भागातील वीरमाता आणि वीर पत्नी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.





Social Plugin