संतोष फुलारी @ग्रामीण प्रतिनिधी भेंडा बु//दि.19 जून2026:
मारुतराव घुले सहकारी साखर कारखाना लि., भेंडा बु. यांच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत मा.सरपंच सुमनताई दत्तात्रय काळे यांची बिनविरोध निवड झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, सभासद आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे व सुमनताई यांनी सहकार क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कारखान्याची सर्वांगीण प्रगती होईल, सभासद शेतकऱ्यांचे हित जपले जाईल आणि संस्थेची आर्थिक व प्रशासकीय वाटचाल अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या बिनविरोध निवडीबद्दल शुभेच्छा देताना अनेकांनी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मारुतराव घुले सहकारी साखर कारखाना अधिक प्रगतीपथावर जाईल, समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविले जातील आणि सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी शुभेच्छुकांनी, "आपल्या नेतृत्वाखाली संस्थेची उत्तरोत्तर भरभराट होवो, शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य घडो," अशा सदिच्छा व्यक्त करून मारुतराव घुले पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.याप्रसंगी डॉ. शिवाजीराव शिंदे,अजित दादा रसाळ,चेअरमन नामदेवराव निकम, डॉ.संतोष फुलारी,पंढरीनाथ फुलारी,देविदास गव्हाणे, काळे सर,माधवराव काळे, देवेंद्र काळे, पप्पू फुलारी,विष्णु फुलारी आदी. मान्यवर उपस्थित होते.





Social Plugin