Ticker

6/recent/ticker-posts

यशवाडी येथे सभागृहाचा छत कोसळला



 महाराष्ट्र ग्रामीण न्युज सोनपेठ /प्रतिनिधी: शिवशंकर तुपकर

मानवत तालुक्यातील यशवाडी देवस्थान संस्थान मंदिरापुढील सभागृहाचा छत कोसळल्याची घटना शनिवारी(दि. २०)दुपारी घडल्याची घटना घडली. 

या घटनेत ५० पेक्षा अधिक भाविक छताखाली दबल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, प्रत्येक शनिवारी यशवाडी देवस्थान येथे जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. आजही मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शन, किर्तन आणि महाप्रसादासाठी जमले होते. मात्र अचानक मुख्य मंदिरासमोरील सभागृहाचा छत अचानक कोसळल्याने भाविकांत एकच खळबळ उडाली. या छताखाली ५० पेक्षा अधिक भाविक अडकले असल्याचा प्राथमिक अंदाज असून घटनेची माहिती मिळताच मानवत पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक शिंदे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. त्याचबरोबर ॲम्बुलन्स देखील या ठिकाणी पोहोचल्या असून तातडीच्या मदतीचे कार्य सुरू आहे.