बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ च्या सुरुवातीलाच कोरेगाव येथील विद्यार्थिनींना एसटी महामंडळाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कोरेगाव आगाराच्या वतीने 'अहिल्याबाई होळकर मोफत बस पासेस'चे वितरण करण्यात आले.शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा उपक्रम राबवून विद्यार्थिनींचा प्रवासाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात आला आहे.
या पास वितरण सोहळ्याप्रसंगी कोरेगाव आगाराचे वाहतूक नियंत्रक श्री. महेश केंजळे व श्री. हरिदास बर्गे उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व अत्यंत सोप्या आणि प्रभावी शब्दांत समजावून सांगितले. तसेच, या मोफत पास सुविधेचा लाभ घेऊन मुलींनी आपले शिक्षण जिद्दीने पूर्ण करावे, असा संदेश दिला.
या कौतुकास्पद उपक्रमाप्रसंगी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र बबनराव बर्गे ,शिक्षिका सौ. पी. एस. बर्गे मॅडम वाहतूक नियंत्रक महेश केंजळे ,वाहतूक नियंत्रक बुवा बर्गे यांच्यासह विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शाळा सुरू होताच तातडीने पास मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थिनींनी कोरेगाव आगार आणि शाळा प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत. कोरेगाव आगाराच्या या तत्परतेचे पालकांमधूनही कौतुक होत आहे.a





Social Plugin