Ticker

6/recent/ticker-posts

दिग्रस आगारात ‘राजमाता जिजाऊ’ बसांची एंट्री



प्रवाशांना आधुनिक सुविधांसह आरामदायी प्रवासाची भेट ना. संजय राठोड यांच्या हस्ते लोकार्पण

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

दिग्रस एसटी आगाराच्या ताफ्यात अखेर आधुनिक सुविधांनी सज्ज ‘राजमाता जिजाऊ’ बसांचा समावेश झाला असून, शुक्रवार १२ जून २०२६ रोजी पालकमंत्री तथा आमदार ना. संजय राठोड यांच्या हस्ते नव्याने उपलब्ध झालेल्या ५ बसांचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे दिग्रससह परिसरातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि तंत्रसुसज्ज प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या वाढत्या प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन दिग्रस आगारासाठी ५६ आसनक्षमतेच्या या नव्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रत्येक आसनाजवळ यूएसबी चार्जिंग पॉइंट, प्रवास अधिक सुखकर करणारे एअर सस्पेन्शन आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी उपयुक्त आधुनिक सुविधा या बसमध्ये देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांच्या प्रवासात मोठी सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात आले.या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन दिग्रस आगारामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाला ना. संजय राठोड यांच्यासह नप पाणी पुरवठा सभापती तथा उपाध्यक्ष सचिन बनगीनवार, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, दिनेश धाडवे, महादेव काळबांडे, ललित राठोड, निलेश मुंडे, प्रा. प्रेम राठोड, सुनील कांबळे, उत्तम ठवकर, राजकुमार वानखडे, साबीर परसुवाले, ऍड.जॉकी राठोड, सदानंद डाडूळकर, स्वप्नील बदूकले, अनिरुद्ध राठोड सह शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये भाजप शहराध्यक्ष अभय इंगळे, अरुण राठोड, जागृती मेहता, सुरेंद्र मिश्रा, अमित चिद्दरवार, संजय घरत, संतोष मांजरखेडे आणि सदानंद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले. नवीन बस सेवेमुळे दिग्रस आगाराच्या वाहतूक क्षमतेत वाढ होणार असून, प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ‘लालपरी’चा प्रवास आता आधुनिक सुविधांनी अधिक सुसज्ज होणार आहे.