महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात 05. 07. 2026
आज दिनांक 2. जुलै 2026. रोजी ताड शिवणी या गावामध्ये सत्यमेव जयंती फार्मर कप 2026. या स्पर्धेतील शेतकरी गटासोबत सिंदखेडराजा तालुक्याचे उपक्रोशी अधिकारी श्री नीलकंठ तायडे सर त्यांच्याबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी ताडशिवनी श्रीमती रोहिणी मेहेत्रे मॅडम उमेद विभागाचे सहकारी श्री अमर जाधव सर आणि पाणी फाउंडेशन चे तालुक्याचे तालुका प्रतिनिधी सिद्धार्थ कवडे सर व शुभम बनसोडे सर व गावचे सरपंच प्रतिष्ठित शेतकरी आणि सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अत्यंत आगळावेगळा आणि उत्साहात पार पडला ताड शिवणी सिंदखेडराजा तालुक्यातील ताड शिवणी शेतकरी महिला गटाने सहभाग नोंदवला आहे कृषी विभाग आणि उमेद विभागाच्या वतीने महाराष्ट्रभर फार्मर कप,,2026. ही शेतकरी गटाची स्पर्धा राबवण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये ताड शिवणी मातोश्री महिला शेतकरी गट संविधान शेतकरी गट मा जिजाऊ शेतकरी गट विघ्नहर्ता शेतकरी शेतकरी गटातील महिला गटातील महिलांनी अत्यंत प्रभावीपणाने जिद्दीने कष्टाने शेतकरी गटांची स्थापना करून गाव पातळीवर कृषी विभाग आणि उमेदवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीत होणारा खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढ करणे या महत्त्वाच्या तत्त्वावर काम करण्यास सुरुवात केली आहे विद्यापीठाने सुचवलेल्या तंत्रशुद्ध पद्धतीचा आधारे महिला शेतकरी गट शेती करत आहे आणि सगळ्या प्रक्रियेतून त्यांचा होणारा खर्च कमी होत आहे आणि त्यांच्या उत्पादनात देखील तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंबून केल्यामुळे वाढ होत आहे यामध्ये महत्त्वाचे काही गोष्टी एकत्रित खरेदी करणे उत्पादन वाढवण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंबन करणे एकमेकांच्या शेतात जाऊन मजुरीचा खर्च वाचवणे यांनी त्याचबरोबर एकमेकांना आधार देणे संकटकाळी गटाच्या रूपात एकत्र येणे या सर्व महत्त्वाच्या बाबीवर गट उत्कृष्ट काम करत आहे आज ह्या भेटीच्या माध्यमातून गावातील सदस्यांच्या स्थितीला खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याच्या दिशेने शेतकरी महिला गटाच्या माध्यमातून वाटचाल होत आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच पती कैलासराव भूमकर यांची सुद्धा उपस्थित राहून सर्व शेतकरी गटांना अत्यंत प्रभावी मार्गदर्शन केले आहे





Social Plugin