Ticker

6/recent/ticker-posts

धक्कादायक ! बाळूमामा देवस्थानात 60 कोटींचा घोटाळा... तत्कालीन कार्याध्यक्षांसह विश्वस्तांवर गुन्हा



ग्रामीण प्रतिनिधी.  वैभव हराळे

 आदमापूर येथील बाळूमामा देवस्थान समितीतील तब्बल ६० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष, विश्वस्त आणि तत्कालीन निरीक्षण अधिकारी रागिणी खडके यांच्यासह संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून केला जाणार असून, तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे