Ticker

6/recent/ticker-posts

२.३६ कोटींची ऑनलाईन फसवणूक गुजरात-यूपीच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांचा फटका




ग्रामीण प्रतिनिधी.  वैभव हराळे

 कोल्हापूर सायबर पोलिसांनी २.३६ कोटी रुपयांच्या 'बॉस स्कॅम'चा पर्दाफाश करत गुजरात आणि उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीतील ५ जणांना अटक केली. आरोपींनी कंपनीच्या CEOचे बनावट रूप घेऊन व्हॉट्सअॅपद्वारे मॅनेजरला फसवत कोट्यवधी रुपये विविध खात्यांमध्ये वर्ग करून घेतल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक झालेल्यांपैकी चार आरोपी महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत