बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री नागनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध चा माजी विद्यार्थी सागर नामदेव नलवडे यांने इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या 65 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले .विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली गणवेश वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी सागर नलवडे यांच्या कुटुंबातील वडील नामदेव सावळा नलवडे ,आई रंजना नामदेव नलवडे, पत्नी सौ .कोमल सागर नलवडे , बहिण राजश्री प्रदीप इंगळे, मित्र अनिकेत सावंत , पृथ्वीराज चव्हण व अनिकेत लहान मुलगा व मुलगी उपस्थित होते . विद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक - शिक्षिका यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी व तसेच सागर नलाडे व त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश दिले .विद्यालयाचे सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी सागर नलवडे यांच्याकडे विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची मागणी केली होती . 'त्याप्रमाणे त्यांनी 65 विद्यार्थ्यांना गणवेश देऊन दातृत्व दाखवले .गरज पडल्यास आणखीन गणवेश देणार असे सागर ने आपल्या मनोगता मध्ये सांगितले . विद्यालयाचे प्राचार्य अंकुश भांगरे यांनी विद्यालयाने व संस्थेने दिलेले संस्कार सागर ने जोपासले व ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यासाठी केलेले गरजु व होतकरू गणवेश दान प्रेरणादायी गोष्ट आहे त्याबद्दल त्याचे अभिनंदन केले . विद्यार्थी यांना भौतिक सुविधा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . विद्यालयातील विद्यार्थी यांनी गुणवत्ता वाढवून आपला नावलौकिक व शाळेचे नवलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे . माजी विद्यार्थी यांचा आदर्श विद्यार्थी यानी घेणे गरजेचे आहे असे मत मांडले . विद्यालयातील सहशिक्षक श्री भगवान सरवदे यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले . पर्यवेक्षक श्री दडस नाना यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते .





Social Plugin