Ticker

6/recent/ticker-posts

सामाजिक आरोग्य जपण्यासाठी प्रयत्नशील राहणार : डॉ. सुरेश जाधव



बुध   दि [प्रकाश राजेघाटगे  ] 

पुसेगाव व पंचक्रोशीतील नागरिकांसाठी पायाभूत आरोग्य विषयक सुविधा पुरवण्यासाठी पुसेगाव पंचक्रोशी वैद्यकीय संघटना क्रियाशील असल्याचे प्रतिपादन डॉ. सुरेश जाधव यांनी केले.

फलटण येथील राधाकृष्ण हॉस्पिटलचे संचालक व इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉ. सागर माने यांचे वतीने वंध्यत्व समस्या निवारण आणि उपाय यावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरामध्ये डिस्कळ, मोळ, बुध, ललगुण, विसापूर, निढळ, वर्धनगड,  भोसरे आणि पुसेगाव परिसरातील वैद्यकीय संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी ग्रामीण भागातील सामाजिक आरोग्य विषयीच्या समस्या जाणून घेणे व त्याच्यावर उपाय योजना करण्यासंदर्भीचे मार्गदर्शन डॉ. सागर माने यांच्याकडून केले. यावेळी डॉ. सुरेश जाधव यांनी वैद्यकीय संघटना ही ग्रामीण भागासाठी आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करणे, आषाढी वारीसाठी मोफत आरोग्य सुविधा, विविध प्रकारची प्राथमिक मोफतऔषधे उपलब्ध करून देणे ही कामे करीत असते अशी माहिती दिली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव जगदाळे, डॉ. प्रदीप देशमुख, डॉ. विक्रांत जाधव, डॉ. भिसे, डॉ. महेश पवार, डॉ. सोमनाथ काटकर इत्यादीसह परिसरातील वैद्यकीय संघटनेचे सभासद उपस्थित होते.  आभार डॉ . विवेक गायकवाड यांनी मानले .