देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के
सध्या मान्सून हा उशिरा चालू झाल्या असल्यामुळे अनेक ठिकाणी वातावरणात बदल झालेले दिसून आलेले आहेत ई ल निनोच्या प्रभावाखाली संपूर्ण भारतात मान्सून हा उशिरा चालू झालेला आहे. या उशिरा झालेल्या पावसामुळे हवेमध्ये अति उष्णता चे प्रमाण वाढीस गेलेले होते. सध्या पाऊस चालू झाल्यामुळे आता हवामानात साधारणता थंडावा निर्माण झालेला आहे. कोकणामध्ये पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद पसरलेला आहे भात शेतीची व शेतीची जी काही कामे आहेत ती पूर्ण करण्याचे काम शेतकरी वर्ग करत आहे. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण अति प्रमाणात असते पण यंदा पाऊस जूनच्या अखेरीस चालू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी जी बियाणे पेरली होती ती नुकसानीत गेलेली आहेत. आता पाऊस दमदार असा कोकणात चालू आहे. समुद्राची पाण्याची पातळी ही वाढलेली गेलेली दिसलेली आहे. अनेक कोकणातील ग्रामस्थानाने पावसाच्या सुरुवातीला चढणारे मासे, खेकडे, हे पकडण्याचे कार्यक्रम सुद्धा चालू केले गेलेले आहेत. काही शेतकऱ्यांनी आंबा बागायतदार यांनी पावसाच्या सरीवर आंब्याची झाडे व इतर झाडे लावण्यास सुरुवात केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पद्धतीने शेती करण्याचे तंत्र अवलंबवले आहे. सध्या पेरणीची काम जोरात चालू आहे. जरी पाऊस उशिरा चालू झाला असला तरी कोकणातील शेतकरी हा शेती केल्याशिवाय रहात नाही हे असे दिसून आलेले आहे. कोकणातील शेतकरी अतिशय कष्टाळू व काटक, व निसर्गाशी झुंज देणारा असा दिसला गेलेला आहे. पाऊस, पाणी, हवा व निसर्गात येणारी जी संकट नैसर्गिक असतात यांना तो सामोरे जाऊन अतिशय कष्टाने पावसात सुद्धा शेती करताना दिसतो. सध्या वातावरणाचं प्रमाण इतके खराब झालेले आहे की पाऊस केव्हाही अवेळी व उशिरा चालू झालेला दिसतो. याचे कारण सर्वांना माहितीच आहे जे काही प्रदूषण आज निर्माण झालेले आहे झाडांची कमतरता, झाडांची कत्तल, नको नको ते प्रकल्प निसर्गात लादले गेलेले असल्यामुळे केमिकल चा वापर निसर्गात रासायनिक क्रिया यांचे प्रदूषण यामुळे निसर्गावर नको नको ता परिणाम झाला आहे. शासनाने झाडे लावा व झाडे जपा हा नियम जरी सांगितला असला तरी प्रदूषण जे व्हायचे ते आहे व झाडांची जी कत्तल व्हायची आहे ती होतच आहे. याला माणूसच जिम्मेदार आहे परिणामी याचा परिणाम मान्सून वर झालेला दिसत आहे व वातावरणात सुद्धा झालेला दिसण्यात आलेला आहे. तेव्हा माणूस या बुद्धी जीव प्राण्यांनी निसर्गाचा विचार करून व आपल्या जिवाचा विचार करून जागतिक पर्यावरण व आपल्या देशाचं व आपल्या राष्ट्राचं चांगलं कसं राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये नैसर्गिक कुठचेही वातावरणात बदल होणार नाही याची खबरदारी घ्यावी. सध्या कोकणात पावसाचा जोर वाढला असला तरी मुंबई उपनगरात सुद्धा त्याचा जोर आहे धरण क्षेत्र जे आज आपल्याला पाणी पुरवते त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडत आहे. मुंबईचे एक धरण तानसा भरले गेलेले आहे ते ओर फ्लोर झालेले आहे. तेव्हा पावसाचा हा मौसम व्यवस्थित राहण्यासाठी व लोकांच्या शेतीची व्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी निसर्गाचा समतोल सर्व राष्ट्रांनी घेतला पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे ही निसर्गाचा समतोल बिघडणार नाही याची खबरदारी घ्यावी.





Social Plugin