Ticker

6/recent/ticker-posts

येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण.....



 प्रतिनिधी : विशाल गंडाळ येवला ता.११/०७/२०२६ शुक्रवारी येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. मागील आठवड्यात सुरू असलेल्या पावसामुळे खरीप पेरणीचा हंगाम सुरु होता. त्यामुळे कांद्याची आवक कमी झाली होती.आणि चाळींमधील साठवणूक केलेला कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब देखील होत असल्याने त्याचा परिणाम कांद्याला प्रति क्विंटल सरासरी २००० रुपये ते २६०० रुपये इतका दर मिळत होता.त्यामुळे शेतकरी समाधानी झाले होते.परंतु आता पावसाने उघडीक दिल्यामुळे कांद्याची आवक अचानक वाढली.आणि शुक्रवारी येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे दिसून आले.शुक्रवारी येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल सरासरी १६०० रुपये ते २१०० रुपये इतकाच दर मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मागील वर्षापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत होते.आणि आत्ता कुठे समाधानकारक भाव मिळत असताना कांद्याची झालेली घसरण ही सर्व शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे.