मन्सूर शहा.धोत्रा . भ.चिखली: ----

प्राप्त माहितीनुसार डोगरशेवली शिवारातील दरी-खोऱ्यात जंगल परिसरात सुरू असलेल्या अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर अमडापूर पोलिसांनी गुरुवारी (दि. ९) कारवाई करत हातभट्टी उद्ध्वस्त केली. या कारवाईत २८ लिटर हातभट्टी दारूसह दारू निर्मितीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले असून, मोठ्या प्रमाणातील सडवाही नष्ट करण्यात आला.

२८ लिटर हातभट्टी दारूसह सडवा नष्ट; दोन महिलांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा

ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने डोंगरशेवली शिवारातील जंगल परिसरात छापा टाकला. कारवाईदरम्यान रेखाबाई सुनील पवार व मंगलाबाई गणेश पवार (दोघी रा. डोंगरखंडाळा, ता. चिखली) या अवैध हातभट्टी दारू

तयार करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी रेखाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू व सुमारे ३,४३० रुपयांचा अन्य मुद्देमाल जप्त केला, तर मंगलाबाई पवार यांच्या ताब्यातून १४ लिटर हातभट्टी दारू आणि सुमारे ३,६५० रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय घटनास्थळी आढळून आलेला हातभट्टीचा सहावा व दारू निर्मितीची व्यवस्था नष्ट करण्यात आली.