निंबी (ता. बाळापूर) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंबी व ग्रामस्थांच्या वतीने श्री. राजेशजी किसनराव मोरे साहेब यांचा पोलीस खात्यातून सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
श्री. राजेशजी मोरे साहेब यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीने प्रथम भारतीय सैन्य दलात (मिलिटरी) १७ वर्षे देशसेवा केली. त्यानंतर पोलीस खात्यात १५ वर्षे प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली. देशसेवा व पोलीस सेवेत त्यांनी दाखविलेल्या शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पणाबद्दल त्यांचा जि. प. शाळा निंबी व ग्रामस्थांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.
राजेश जी मोरे साहेब हे जिल्हा प्राथमिक मराठी शाळेमधूनच यांनी चौथीपर्यंतच आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा ही टिकली पाहिजे हे यांचं ध्येय आहे याच उद्दिष्टांनी ते वेळोवेळी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंबी येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण वस्तू व इतर व आर्थिक मदत वेळोवेळी करत असतात
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष राऊत सर, शिक्षक गणेश देशमुख सर, तंटामुक्ती अध्यक्ष)राजारामजी सगणे, शिवदास पोचपोहे, विशालभाऊ वानखडे,( सरपंच )करुणाताई वानखडे कविता ताई मोरे रेखाताई जाधव, ईंदुताई वानखडे, रेखाताई वानखडे, संगीताताई वानखडे तसेच ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी श्री. मोरे साहेब यांच्या देशसेवा व जनसेवेतील योगदानाचा गौरव करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






Social Plugin