Ticker

6/recent/ticker-posts

ईश्वर बोराटेचे शिष्यवर्ती परिक्षेत यश



 बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 बुध ता . खटावचे सुपुत्र , खटाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बोराटे यांचे चिरंजीव व आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचा विद्यार्थी ईश्वर ज्ञानेश्वर बोराटे याने पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षेत  

264 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत 62 वा क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीधारक झाल्या . याबददल त्याचे मुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव वैभव राजेघाटगे , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . प्रियाताई शिंदे , बुधच्या सरपंच सौ . सुजाता बोराटे , उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे , ग्रामपंचायत  अधिकारी संघटनेचे पदाधिकारी , बुध ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले .