बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री.हनुमानगिरी ज्युनियर कॉलेज पुसेगाव मधे अतिशय संवेदनशिल विषय *" प्रेमात पडताना"* यावर संवादशाळा पार पडली. त्यावेळी विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या आधारे मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थिनी सुरेखा खराटे उर्फ डॉ. सुषमा बसवंत ( कार्याध्यक्ष - ठाणे जिल्हा), रुपेश शोभा ( सहकार्यवाह, राज्य महिला सहभाग विभाग), महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांचे मार्गदर्शन लाभले.
अलीकडेच एका तरुणीने नियोजित पतीचा खून केला. हे प्रकरण माध्यमांमध्ये गाजते आहे. या पार्श्वभूमीवर प्रेम आणि आकर्षण यामध्ये फरक काय? प्रेम हिंसेकडे वळू शकते का? प्रेमामध्ये हिंसा का व कशी येते? या प्रश्नांची उत्तरे तरुणाईला मिळणे अवघड जाते.ते सोपे करून सांगण्याचे काम या द्वयीने केले.या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष डॉ.सुरेशराव जाधव, प्राचार्य श्री.गोफणे सर, पर्यवेक्षिका सौ.लाड मॅडम, विभागप्रमुख जाधव सर,जेष्ठ शिक्षक मोहनराव गुरव सर,माजी शिक्षण विस्तार अधिकारी मु.का. खराटे गुरुजी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद लाभला. सर्वांनी समाजासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्याची गरज व्यक्त केली.





Social Plugin