

पळसवाडी प्रतिनिधी अभिषेक ठेंगडे
वेरूळ येथील श्री संत जनार्दन स्वामी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (गुरुकुल) मध्ये आज दि. 13/07/2026 रोजी *विद्यार्थी संसद निवडणूक*2026-27* मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार विद्यार्थी निवडणूक पार पडली यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींसाठी दि.10 जुलै रोजी *नामांकन दाखल* करणे. दोन दिवस उमेदवारांना *प्रचार प्रसार करणे* यासाठी उत्कृष्ट वेळापत्रक तयार करून आज मोबाईलवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून *ईव्हीएम द्वारे* मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी प्रत्येक वर्गात निवडणूक केंद्र व केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक, मतदान अधिकारी दोन, मतदान अधिकारी तीन यांची प्रत्येक वर्गनिहाय नियुक्ती करून व नोंदी घेऊन निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामुळे सर्व विद्यार्थ्यांना कशाप्रकारे निवडणूक पार पडते याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मतदान प्रक्रियेत मतदान करून विद्यार्थी मतदाराची भूमिका पार पाडता आली. यामुळे विद्यार्थ्यांना *स्वानुभावातून लोकशाहीची ओळख* झाली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी निवडणुकीतून प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधी निवडून आले त्यातून बहुमताद्वारे मॉनिटर व उपमाॅनिटर यांची निवड करण्यात येणार आहे. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी मधूनच उद्या दि. *14 जुलै रोजी शालेय मुख्यमंत्री व इतर खातेनिहाय मंत्रिमंडळाची निवड* केली जाणार आहे. यावेळी विद्यार्थी निवडणूक प्रक्रिया कशी चालते याचे प्रात्यक्षिक संस्थेचे गुरुकुल समन्वयक श्री काळोखे गुरुजी यांनी स्वतः मतदान करून पाहिले. निवडणूक प्रक्रियेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री ढोबळे डी.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री मुळे गुरुजी तसेच ज्यांनी निवडणूकीचे उत्कृष्ट नियोजन केले असे विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री अधाने गुरुजी यांच्यासह श्री राहणे गुरुजी, श्री देव गुरुजी, श्री सोनकांबळे गुरुजी, श्री भंडारे गुरुजी, श्री पवार गुरुजी, श्री सुर्यवंशी गुरुजी, श्रीमती वैष्णव ताई श्रीमती जर्हाड ताई यांच्यासह सर्व गुरुजनांनी निवडणुक प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.




Social Plugin