बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
महाविद्यालयाचा ‘वेदावती’ वार्षिक अंक हा विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, विचारशक्ती आणि साहित्यिक अभिव्यक्तीचा आरसा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, संशोधन व संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.मंजुश्री बोबडे यांनी केले.
कला व वाणिज्य महाविद्यालयात 'वेदावती' वार्षिक अंक प्रकाशन सोहळा कार्यक्रमप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.सुनील हेळकर,प्रा.डॉ.संजय क्षीरसागर, प्रा.डॉ.हनुमंत निमसे, प्रा.श्रीमती मनुजा सोनार इत्यादी उपस्थित होते.
पुढे आपल्या भाषणात प्राचार्या डॉ. बोबडे म्हणाल्या, “वेदावती” हा वार्षिक अंक विद्यार्थ्याच्या ज्ञान, कला, संस्कार आणि सामाजिक जाणीवाचा दस्तऐवज आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखन, वाचन, संशोधन आणि चिकित्सक विचार करण्याची वृत्ती विकसित होते. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाला वाव मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साहित्य निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामधून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर म्हणाले, “ महाविद्यालयाचा ‘वेदावती’ वार्षिक अंक हा शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेतील महत्वाचा भाग आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य अंकाद्वारे केले जाते. संपादक मंडळ, प्राध्यापक, विद्यार्थी, लेखक आणि सर्व महाविद्यालयातील सर्व सेवक यांच्या प्रयत्नातून दर्जेदार अंक साकारला आहे. तसेच संपादकीय भूमिका सांगत असताना प्रा. डॉ. हनुमंत निमसे म्हणाले,’ “महाविद्यालयाचा ‘वेदावती’ वार्षिक अंक म्हणजे विद्यार्थ्यांच्या सृजनशील विचारांचा साहित्यिक अभिव्यक्तीचा आणि संशोधन वृत्तीचा आरसा असतो. विद्यार्थ्यांच्या कविता, लेख, ललित लेखन, अनुभवकथन, संशोधनपर लेखन असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.पांडुरंग बर्गे म्हणाले,'वेदावती वार्षिक अंक विद्यार्थ्यांच्या कल्पकता आणि वैचारिक प्रगल्भतेचे प्रभावी व्यासपीठ आहे. तसेच विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, आणि संशोधनाची आवड जोपासून समाजभिमुख दृष्टिकोन विकसित करावा असे आवाहन केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत प्रा.डॉ.संजय क्षीरसागर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.महेश आवळे यांनी केले तर आभार प्रा.शामराव वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते





Social Plugin