प्रतिनिधी : विठ्ठल कदम शिवपुरीकर
भोकर (धावरी) : सम्राट अशोक महाबुद्धविहार, धावरी ता. भोकर जि. नांदेड येथे भव्य ध्यान साधना व श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध ठिकाणांहून आलेल्या श्रामणेर भिक्षू व भन्ते यांनी सहभाग घेतला.
या निमित्ताने उमरी (जा.) येथील बौद्ध उपासक-उपासिकांच्या वतीने श्रामणेर भिक्षू व भन्ते यांना समर्पित भव्य स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. श्रामणेर भिक्षूंची गावातील प्रमुख मार्गांवरून शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून व बुद्ध वंदना देत श्रामणेर भिक्षूंचे स्वागत केले.
यानंतर उमरी (जा.) येथील उपासक-उपासिकांच्या वतीने सर्व श्रामणेर भिक्षू व भन्ते यांना श्रद्धापूर्वक भोजनदान करण्यात आले. या पुण्यकार्यामध्ये अनेक बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दानधर्माची परंपरा जपली.रॅलीमुळे गावात धार्मिक, सामाजिक व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. बुद्ध, धम्म आणि संघ यांच्या शिकवणीचा प्रसार करत शांतता, बंधुता, करुणा आणि मानवतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
या कार्यक्रमास गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, बौद्ध उपासक-उपासिका तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचे कौतुक करत अशा धार्मिक व सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, सद्भावना आणि नैतिक मूल्यांची जपणूक होत असल्याची भावना व्यक्त केली.





Social Plugin