(अनिल चव्हाण – प्रतिनिधी, जाफ्राबाद)
जालना-सिंदखेडराजा महामार्गावरील नाव्हा ते सावरगाव माळ दरम्यानच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार तसेच चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
सदर रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनधारकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याची दुरवस्था झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
नागरिकांची मागणी : नाव्हा ते सावरगाव माळ दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवून रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी. अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





Social Plugin