Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्रासाठी नवी ऊर्जा: डॉ.अलका पोतदार


 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]     

     शिक्षकांचा सन्मान म्हणजे केवळ त्यांच्या कार्याचा गौरव नसून भावी पिढी घडविणाऱ्या मूल्यांचा सन्मान असतो.गुणवंत विद्यार्थी, शिक्षक यांचा गौरव  शिक्षणक्षेत्रासाठी नवी ऊर्जा असते.शिक्षकांनी नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचे बारकाईने वाचन करून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत अध्यापन करावे,असे प्रतिपादन बालभारती,पुणेच्या हिंदी भाषा विशेषाधिकारी डॉ.अलका पोतदार यांनी केले.

सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ व राष्ट्रभाषानुरागी शिक्षक,शिक्षकेतर सह.पतसंस्थेच्या राष्ट्रभाषा भवन संभाजीनगर (सातारा) येथे आयोजित ४३ व्या संयुक्त वार्षिक पुरस्कार वितरण व सत्कार समारंभात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे म्हणाले व्यावसायिक विकास व व्यक्तिगत विकास साधण्याचे कार्य  दोन्ही संस्था करत असून येथे स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारा विद्यार्थी घडतो.आयुष्याला द्यावे उत्तर या कवितेच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांना छानसा संदेश दिला.

विद्या परिषद (एस.ई.आर.टी.), पुणे येथील अभ्यासक्रम समन्वयक वआय टी विभाग प्रमुख डॉ.संदीप मुळे म्हणाले ,शिक्षकांनी आधुनिक टेक्नॉलॉजी चा वापर करून  विद्यार्थ्यांमध्ये भाषेची गोडी निर्माण करावी, त्यासाठी ए आय साथी, दीक्षा ॲप चा वापर करावा असे आवाहन केले.

प्रमुख वक्ते प्रा. श्रीधर साळुंखे म्हणाले,प्रामाणिक राहून सेवा करणे ही तपस्वीता आहे.देशाचे भविष्य युवकांच्या मार्फत घडविणे ही आपली जबाबदारी असून आपण मार्गदर्शक म्हणून केलेल्या कामासाठी पाठीवर टाकलेली थाप म्हणजे हे पुरस्कार असतात.युवा पिढी बिघडलीअसा दोष सर्वांनाच देता येणार नाही.अनेक युवकांनी माऊलीच्या पालखीत जाऊन सेवा केली,संस्कृती जपली.

  प्रास्ताविक पर भाषणात सातारा जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष ता. का.सूर्यवंशी यांनी हिंदी अध्यापक मंडळ व राष्ट्रभाषानुरागी पतसंस्थेच्या वाढत्या आलेखाची माहिती दिली. 

कोल्हापूर विभागीय शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रघुनाथ जाधव हे मनोगतात म्हणाले,मंडळाचे आदर्श कार्य सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे.

   समारंभात मंडळाच्या कार्यात विशेष योगदान देणारे शिक्षक,पदोन्नती प्राप्त शिक्षक,विशेष प्राविण्य मिळविलेल्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. तसेच राष्ट्रभाषा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा,महामंडळ परीक्षा व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या शाळा, विद्यार्थी आणि शिक्षक यांना एकूण १५४ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

   प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप्रज्वलन संपन्न झाले. ईशस्तवन व स्वागत गीत मंडळाच्या गीतमंचाचे प्रमुख अनिल कदम व सहकाऱ्यांनी सादर केले.मंडळ व पतसंस्थेच्या पदाधिकारी यांचे हस्ते मान्यवरांचा सत्कार करणेत आला.

    सूत्रसंचालन सौ.उज्वला मोरे व  गुलाब पठाण यांनी केले तर अप्पासाहेब पाटील यांनी आभार मानले.कार्यक्रमास शालाप्रमुख,हिंदी शिक्षक,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष शाहनवाज मुजावर,इकबाल मुल्ला,परीक्षा मंत्री शि.रा.खामकर, श्रीकांत लावंड,विजयकुमार पिसाळ, सुधाकर माने,हणमंत सूर्यवंशी,सौ. सुनंदा शिवदास सौ.दिपाली पवार, सागर पाटील,सर्व तालुकाध्यक्ष, व्यवस्थापक नवनाथ शिंदे व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 One attachment

  •  Scanned by Gmail