गुरुपिंपरी | प्रतिनिधी : कैलास कोल्हे
नीट (NEET) परीक्षेत 584 गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या हर्षवर्धन गणेश कोल्हे यांचा मा. माजी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मा. राजेशभैया टोपे यांनी हर्षवर्धनचे अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या बळावर उच्च ध्येय गाठावे, असा संदेशही त्यांनी दिला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही हर्षवर्धनच्या यशाचे कौतुक करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. हर्षवर्धनच्या या यशामुळे कुटुंबीय व परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.





Social Plugin