Ticker

6/recent/ticker-posts

13 वर्षीय बालिकेवर शेजार्याकडून कडून अत्याचार,19 आठवड्याची गरोदर..





 दिग्रस तालुक्यातील खळबळ जनक घटना...आरोपीस अटक

 राजपाल बनसोड  प्रतिनिधी दिग्रस

तालुक्यातील एका गावात ५४ वर्षीय इसमाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १९ जुलै रोजी उघडकीस आली असून तालुक्याचे टोकावरील गावातील घटनेची आर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मनहेलावून टाकणाऱ्या घटनेचा सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतातील तूर पिकात वानर शिरले असल्याचा बहाणा करून पीडित मुलीला शेतात नेले. तेथे त्याने मुलीशी गैरवर्तन करून तिच्यावर अत्याचार केला.

घाबरलेल्या मुलीने सदर प्रकारची कुठेही वाच्यता न करता ही बाब स्वतःजवळच दडवून ठेवली. नंतर मात्र प्रकृती बिघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यानंतर १९ जुलै २०२६ रोजी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी आर्णी पोलीस ठाण्यात अप.क्र. बीएनएसचे कलम ६४ (२) (i), ६४ (२) (n), ६५(१), ३५१(२) (३) सह पोक्सोचे कलम ४, ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक संजय खंदारे यांच्या मार्गदर्शनात एपीआय धेमकेवाड पुढील तपास करीत आहेत घटना समजताच गावात संतापाचे वातावरण तापले आहे. महिला ६०४/२०२६ नुसार संघटनांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.