प्रतिनिधी : विजय आर गायकवाड
रिसोड : घोटा येतील प्रा डॉ रमेश विष्णु मोरे यांचा मुलगा प्रणव मोरे याने महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या चौथ्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षेत रिसोड भागातून अत्यंत कठीण परिस्थितीतून हे यश मिळविले आहे. प्रणव हा भावना पब्लिक स्कूल रिसोड या शाळेतील विद्यार्थी असुन याने सुरुवातीपासूनच या स्कॉलरशिपची तयारी केली होती, यामध्ये त्याचे आई वडील, आजी आजोबा व इतर घरातील सर्व मंडळी यांनी त्याला नेहमीच बहुमोल असे मार्गदर्शन केले आहे. या त्याच्या यशाबद्दल प्रा डॉ केशव कोकाटे, सौ अर्चना कोकाटे, शिवांश कोकाटे, प्रा डॉ रमेश मोरे, सौ शुभांगी मोरे, तनुश्री मोरे, प्रा डॉ विजय गायकवाड, सौ प्रीती गायकवाड यांनी प्रणव याचे कौतुक करताना त्याला "अभ्यास कसा करावा" हे पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार केला.





Social Plugin