विलास पाटील..भडगाव प्रतिनिधी
दिनांक 25जूलै ते 29जूलै श्रीक्षेत्र कनाशी हे खानदेशातील पौराणिक व ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेले महत्त्वाचे असे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते चार दिवस गुरुपौर्णिमा यात्रा उत्सव साजरा होत आहे त्या दृष्टीने परिसरात दुकान थाटण्यात आली असून भाविकांच्या गर्दीने परिसर गजबजून गेला आहे गावात भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने ग्रामस्थ व ग्रामपंचायतच्या वतीने तयारी करण्यात आली आहे सकाळी सात वाजता मंगल स्नान उटी गंध विडा अवसर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे
श्रीक्षेत्र कनाशी गावाला महानुभाव पंथ उपासनेची 800 वर्षाची परंपरा देशात श्रीक्षेत्र कनाशी गावाची वेगळीच ओळख निर्माण केली आहे संपूर्ण गाव शुद्ध शाकाहारी म्हणून ओळखले जाते
श्रीक्षेत्र कनाशी गावात साधारण बाराव्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आल्याचा इतिहास आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभाव पंथाचे आचार विचार होय ते येथील संपूर्ण गावकऱ्यांनी स्वीकारले आहे
ग्रामस्थांच्या वतीने दाढ विशेष दर्शन व्हावे म्हणून येणाऱ्या भाविकांसाठी सभामंडपात दाढ ठेवण्यात आली आहे गुरु पौर्णिमा निमित्त श्रीक्षेत्र कनाशी येथील साधुसंत महंत ग्रामस्थ यांच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्सवाची जयत्त.तयारी सुरू आहे





Social Plugin