Ticker

6/recent/ticker-posts

देवशयनी (आषाढी) एकादशीनिमित्त भाविकांची मंदिरांमध्ये मोठी गर्दी



महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी : विजय अधिकार, जव्हार


जव्हार : आषाढ शुक्ल एकादशी अर्थात देवशयनी (आषाढी) एकादशी निमित्त आज जव्हार येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भक्तांनी पहाटेपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली. हरिनामाचा गजर, भजन-कीर्तन, धार्मिक कार्यक्रमांनी परिसर भक्तिमय झाला. देवशयनी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होत असल्याने या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.


यावेळी अनेक भाविकांनी उपवास करून श्रीविठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी जव्हार शहरातील विविध शिक्षण संस्थांच्या विद्यार्थ्यांनी वारकरीचा वेष परिधान करून टाळ मृदुंगाच्या गजरात मंदिरापर्यंत दिंडीचे आयोजन केले.

एकादशीच्या निमित्ताने जव्हार परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.