Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थ्यांचा कामगार मंडळाच्या वतीने सत्कार



महाराष्ट्र ग्रामीण न्यूज | प्रतिनिधी – संतोष घाणे, बारशिगवे

इगतपुरी तालुक्यातील बार्शिंगवे येथील जनता विद्यालयातील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय टक्केवारी मिळवून यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा बार्शिंगवे कामगार मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला कामगार मंडळातील रामदास बोराडे, दिगंबर चोथे, सोपान कोरडे, मधुकर भोईर, नामदेव बोराडे, डॉ. सदाशिव घाणे, अशोक बोराडे, बांगर सर, लहामगे सर, भोईर तसेच गावातील ग्रामस्थ,सरपच उपसरपच पालकवर्ग, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर भविष्यात मोठे यश मिळवावे, असे आवाहन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या सत्कार सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीचे वातावरण निर्माण झाले.