Ticker

6/recent/ticker-posts

एसआरपीएफ अल्ताफ शेखचा रजा कमिटीतर्फे सत्कार



नांदेड:मुखेड तालुक्यातील ग्राम चांडोळा येथील अल्ताफ एकबाल शेख चा रजा कमिटीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

अल्ताफ या युवकाची नुकतीच राज्य राखीव पोलीस बल गट जालना या ठिकाणी 'सशस्त्र पोलीस शिपाई' म्हणून निवड झाल्याबद्दल सप्रेम भेट देत अभिनंदन करीत शुभेच्छां देण्यात आल्या.

अत्यंत कष्टदायी दांपत्याच्या मुलाने  यश मिळविल्याबद्दल अल्ताफचे ठिकठिकाणी अभिनंदन होत आहे.

वडील एकबाल शेख हे लाकूड फोडून विक्रीचा लहानसा व्यवसाय करीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.अल्ताफ नांदेड गृहरक्षक दला अंतर्गत मुखेड पोलीस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते.यावेळी शेकापचे राज्य मध्यवर्ती सदस्य तथा राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे तालुकाध्यक्ष असदभाई बल्खी,राष्ट्रीय अल्पसंख्यांक परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा पञकार मेहताब शेख,चांडोळा मस्जिदचे हाफिज मौलाना अहेमद रजवी,ग्राम आरोग्य अधिकारी

गोंदिया,शेख सुलेमान, धर्मादाय निरीक्षक जमीर शेख,कर सहाय्यक जीएसटी मुंबई आरिफ तांबोळी,ठाणे पोलीस शेख शादूल,खदीर भाई शेख,शब्बीर भाई बल्खी,मौला पठाण, चांडोळा बँक सहाय्यक महमदरफी मदार, रमजान शेख,शेख सिराज,गौस शेख,इम्रान शेख,रफीक शेख,अयान, पाशामियाँ शेख,शेख नबी,शेख जुबेर,सोहेल पठाण,

शेख सुलतान, शेख अरबाज,शेख गफार, शेख युनूस आदि बांधव उपस्थित होते.